BIG BREAKING : संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार? विधिमंडळात मोठ्या घडामोडी, कारवाई होणारच?
BIG BREAKING : संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार? विधिमंडळात मोठ्या घडामोडी, कारवाई होणारच?
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे आमदार संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना हे विधीमंडळ नाही चोर मंडळ आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षाचे आमदार आज विधानसभा आणि विधान परिषदेत आक्रमक झाले. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर विधीमंडळात वेगाने घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने विधीमंडळाबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यांच्याकडून पुन्हा असं वक्तव्य होऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलीय. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केलीय. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे मित्रपक्षाच्या नेत्यांनीदेखील राऊतांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार राऊतांवर कारवाई करण्यासाठी आग्रही आहेत.
विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समितीसाठी नावे मागवली
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधीमंडळात वेगाने घडामोडी घडत आहेत. सर्वात आधी सत्ताधारी पक्ष आता विधीमंडळातील महाविकास आघाडी सरकाच्या काळातील हक्कभंग समिती बरखास्त करणार आहे. त्यानंतर नव्याने विधीमंडळ हक्कभंग समिती नेमली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळ पक्षांकडून नावे मागवली आहेत. या हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदासाठी अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांच्या नावांची चर्चा आहे.