सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या बंडखोरीवरून घमासान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे ३ सवाल, काय Updates?
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या बंडखोरीवरून घमासान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे ३ सवाल, काय Updates?
सत्तासंघर्षच्या महासुनावणीला आज सुप्रीम कोर्टात (Supreme court)   पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी शिवसेनेतील फुटीर गटाचे अधिकार आणि त्यांच्या कृतीवरून महत्त्वाचे प्रश्न कोर्टासमोर उपस्थित केले आहेत. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांची बंडखोरी हा अत्यंत नियोजित प्लॅन होता, असे वारंवार सांगण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरणाशी हा घटनाक्रम सुसंगत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. मात्र ठाकरे गटाकडून ही दोन्ही प्रकरणं वेगळी असल्याचा दावा करण्यात येतोय. याच मालिकेत कपिल सिब्बल यांनी आज कोर्टासमोर प्रश्न उपस्थित केले.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काय?
- विधिमंडळ पक्षातील फुट ही पार्टीची फुट मांडायची का ?
- आम्ही नेतृत्वाला मानत नाही, असं फुटीर गट म्हणू शकतो का?
- एकाच चिन्हावर निवडून आलेले लोक वेगळे निर्णय घेऊ शकतात का?
- वाट्टेल ते आम्ही करू, असं म्हणायचा अधिकार फुटीर गटाला आहे का?
- विधानसभेत फूट आहे का, हे पाहण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय.
- पक्षात २ गट झाल्यामुळे चिन्हाचं प्रकरण आयोगाकडे पाठवणं योग्य नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय.
शिवसेनेचं प्रकरण घटनापीठासमोर असताना आयोग कसा निर्णय देऊ शकतं, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलाय.
ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी उद्या
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात ठाकरे गटाने काल दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली आहे. यासंदर्भातील युक्तिवाद आणि तसेच पुढील सुनावणी उद्या दुपारी ३.३० वाजेपर्यंत होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भात घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचं ठाकरे गटाच्या याचिकेत म्हटलं आहे. तसेच घटनापीठासमोरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.