सोयाबीनचे दर ५ हजारांपर्यंत उतरले शेतकऱ्यांना दणका
- बाजारात उलटं चक्र सुरु, सोयाबीनच्या दरानं टेन्शन वाढवलं
- सोयाबीनचे दर घसरल्याने आवकही मंदावली
कांदा, कापूस, द्राक्षे, टोमॅटोपाठोपाठ आता सोयाबीन उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण होतं असून सोयाबीन उत्पादकांवर संकट ओढावलं आहे.यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्पादन कमी | असून गेल्या काही वर्षांचा तुलनेत यंदा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या पिकाला भाव मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.बुधवारी कळमन्यात सोयाबीनचे प्रतिक्विंटल भाव ४७५० ते ५०५० रुपये आहेत. भाव उतरल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.सोयाबीनच्या मागणीत घट आणि दर उतरण्याचे मुख्य कारण म्हणजे देशविदेशात सोयाबीन ढेपला मागणी कमी झाली आहे. दोन वर्षांआधी जूनच्या अखेरीस सोयाबीनला ९९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. पण आता भाव अर्ध्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन महिन्यांआधी भाव ६५०० रुपयांपर्यंत 7 गेला होत. भाव आणखी वाढण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी मालाची विक्री थांबविली होती. पण आता भाव ५ हजारांपर्यंत उतरल्यामुळे शेतकऱ्यांचे संकट वाढले आहे. यासोबतच दोन महिन्यांआधी १४६ रुपये किलोवर असलेले सोयाबीन तेलाचे भाव बुधवारी १२५ रुपये किलोपर्यंत घसरले होते. एकंदरीत पाहता यंदा सोयाबीन   दृष्टचक्रात सापडले आहे.