यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन
यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन
गहू उत्पादन १ हजार १२१ लाख टनांवर पोहचू शकते. 
केंद्र सरकारने २०२२-२३ च्या हंगामातील पीक उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला. या अंदाजात सरकारने गहू आणि तांदूळ उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचेल, असा अंदाज जाहीर केला आहे   तर त्याबरोबरच मका, हरभरा, मूग, मोहरी, ऊस आणि बाल उत्पादनही विक्री होईल, असा अंदाजही सरकारने व्यक्त केला. सध्या देशात गहू आणि तांदळाचे दर वाढलेले आहेत. त्यातच सरकारने विक्रमी उत्पादनाचे अंदाज व्यक्त केल्याने ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. मागील हंगामात वाढलेल्या उष्णतेमुळे गहू उत्पादन कमी झाले होते. मात्र यंदा गहू उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ५ टक्क्यांनी जास्त राहण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात १ हजार ६८ लाख टन गहू उत्पादन झाले होते. तर यंदा १ हजार १२१ लाख टनांवर गहू उत्पादन पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.