खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण
खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण
मोहरी, शेंगदाणा,सूर्यफुल तेलाच्या किमतीचे दर पुन्हा कमी
खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली असून लवकरच भाव आणखी घसरणार आहेत. गेल्या सात महिन्यात इंधन दरवाढ झाली नसली तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र कमी झालेल्या नाहीत. तर महागड्या खाद्यतेलावर मात्र केंद्र सरकारला उपाय सापडला आहे. मध्यंतरी किचन बजेट कोलमडणाऱ्या खाद्यतेलावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने कमी होत आहे. मोहरी, शेंगदाणा आणि इतर खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 
देशात सोयाबीन, शेंगदाणा, मोहरी, तीळ, सूर्यफुल, करडी आणि इतर तेल खाण्यात येते. 
तर सूर्यफुल आणि सोयाबीन तेल अगोदर पैसे जमा करुन खरेदी करावे लागत आहे. या सर्व प्रकारात केंद्र सरकारला महसूली तोटा सहन करावा लागत आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या किंमती अजून ही कमी होणार आहे.. खाद्यतेल येत्या काही दिवसांत 30-70 रुपयांहून स्वस्त होण्याची शक्यता आहे.
ब्युरो रिपोर्ट apmc news