नेरूळ मधील खुनाचा लागला छडा चार आरोपी अटकेत..
25 वर्षापूर्वीचा बदला पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारांना तब्बल 25 लाखाची सुपारी
नवी मुंबई: 25 वर्षापूर्वी गुजरात मध्ये केलेल्या खून आणि मारहाणीचा बदला नवी मुंबईत घेतला.चार दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरूळ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाचा भर दिवसा दोन जणांनी गोळ्या झाडून खून केला होता,त्याचा तपास पोलिसांनी जवळपास पूर्ण केला असून,सदर गुण्याबाबत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यातील मुख्य आरोपी गुजरात कच्छ मधला असून,गोळीबार करणारे तीन आरोपी बिहार मधून ताब्यात घेतले आहेत.25 वर्षापूर्वी मयत व्यक्तीने गुजरातमध्ये एका व्यक्तीचा खुन करून त्यांचा नातेवाईकांना भर चौकात मारहाण केली होती,त्याचाच राग मनात धरून मयत व्यक्तीचा काटा काढण्यासाठी बिहार मधील सराईत गुन्हेगारांना 25 लाखाची सुपारी दिली,त्या प्रमाणे आरोपींनी मयत व्यक्तीची रेकी करून त्याला नेरूळ मध्ये रस्त्यात अडवून गोळ्या झाडून ठार केले.पोलिसांनी घटनेचा तपास सुरू करून त्यातील चार आरोपी ताब्यात घेतले तर अजून काही आरोपी यात सामील आसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून,पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे .. यात सामील असलेले   आरोपी लवकरच जेरबंद होतील असा विश्वास व्यक्त केला...