‘एल-निनो’च्या चर्चेमुळे सोयाबीनचे दर वाढणार ? काय आहे ‘एल-निनो’?
‘एल-निनो’च्या चर्चेमुळे सोयाबीनचे दर वाढणार ? काय आहे ‘एल-निनो’?
गेल्या काही दिवसांपासून एल-निनो चर्चेत आला आहे. अमेरिकी हवामान संस्था यंदाच्या मॉन्सून हंगामात ‘एल-निनो’चा प्रभाव राहण्याचा इशारा देत आहेत. भारतातील हवामान संस्थांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
एल निनो म्हणजे काय ते आधी समजून घेऊ :
प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात. त्यामुळे पश्चिमेकडील भागात दुष्काळ पडतो तर पूर्वेकडील भागात अतिवृष्टी होते.थोडक्यात यंदा एल-निनो हा घटक सक्रिय राहिला तर भारत आणि आशिया खंडातील इतर देशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. तर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना इत्यादी भागांत अधिक पाऊस होईल. ‘एल-निनो’चा अंदाज खरा ठरला तर खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होईल.प्रामुख्याने सोयाबीन व इतर तेलबिया, कापूस, मका यांना फटका बसेल. तसेच पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे रब्बी पिकांवरही परिणाम होऊ शकतो. तसेच फळे व भाजीपाला पिकांवरही उत्पादनघटीचे सावट असेल.सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या शेतमालाचे दर वाढतील. अर्थात एल-निनो खरंच येईल का, त्याचा नेमका किती परिणाम होईल, याचा अंदाज आताच बांधणं घाईचं ठरेल. मे महिन्याच्या शेवटी नेमकं चित्र स्पष्ट होईल, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं.