मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याची आत्महत्या
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी फळ मार्केटमध्ये उघडकीस आली. संपत कराळे या व्यापाऱ्याने N विंग गाळा नंबर 914 मध्ये गळफास घेतला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून व्यापाऱ्याचा मृतदेह वाशी मनपा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, अचानक फळ मार्केटमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वच व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे
संपत कराळे नामक व्यापारी फळ मार्केटमधील ओपॅनशेड मध्ये हंगामी फळांचा व्यापार करत होता. N विंग 914 गळ्याच्या पेढीवर ते राहत होते. हसतमुख, मनमिळावू आणि चांगले व्यापारी होते अशी माहिती काही व्यापारी देत आहेत. तर कर्जबाजारीपणा किंवा काही वादविवादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे याबाबत अधिक तपास करत आहे.