मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील बाजारभाव - २०/३/२०२३
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजचे बाजारभाव
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये ७६८ गाड्यांची आवक
भाजीपाला मार्केट मध्ये आवक वाढल्याने आज भाज्यांच्या दरात घसरण
६० रुपये किलोच्या दरात विक्री होणारी फरसबी आज २५ ते ३० रुपये दराने विक्री होत आहे
मुंबई APMC घाऊक बाजारात   भाज्यांच्या दरात दिवसेंदिवस चढ उतार दिसून येते .. . मुंबई apmc भाजीपाला   घाऊक मार्केट मध्ये   आज ७६८   गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ उतार जाणून घेऊया ..
भाजीपाला मार्केटमध्ये आज मेथी १०   रूपये ,कांदापात   १६, शेपू १५ रुपये , भोपळा २५ रुपये, शिमला ३५ रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भाव ३०   रुपये प्रतिकिलो, भेंडी ४६ रुपये दराने विक्री होत आहे.. आज गवारचा भाव १० रुपयांनी वाढला असून   ७० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे, तर फरसबी ६० रुपये किलोच्या दरात   विक्री होणारी आज २५ रुपये दराने विक्री   होत आहे .. बाजारात   कोबीचा दर १० रुपये किलो आहे , फ्लॉवर १४ रुपये, टोमॅटो १५ रुपये, मिरची ४५ ते ५० रुपयाने विक्री होत आहे..   कोथिंबीर १५ रुपये दराने विक्री होत आहे, तोंडली ५० रुपये ,कारली ३० रुपये   किलोने विक्री होत आहे..