बळीराज्याची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
बळीराज्याची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
- मालाला उत्तम दर मिळत असल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला.
- रसायन मुक्त शेती या अभियानाची सुरुवात झाली असून अनेक खाजगी कंपन्या पुढे येत आहेत.
- उत्पादित होणारा माल खरेदी केला जात असून   निर्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे.
खतांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक द्रव्यांची फवारणी यामुळे शेतीतील उत्पादन खर्च वाढत होता. त्यासोबत रासायनिक खतांनी कीटकनाशके यांच्या वाढत्या प्रमाणामुळे जमिनीची पोतही खालवत होती. या गोष्टी लक्षात घेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळला असून यातून उत्पादन ही अधिक आणि दरही चांगले मिळत असल्याने शेतकरीसमाधानी आहेत अशी माहिती मिळाली आहे. मागच्या कित्येक वर्षापासून रासायनिक द्रव्यांच्या अती फवारणीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्याबरोबर पूर्वीसारखं उत्पादन घेता येत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.
सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील गुणवत्ता सुधारली असून उत्पादन खर्च खूप कमी झाला आहे. रासायनिक पद्धतीने केळीची शेती केली तर एका झाडाला दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत खर्च येत असतो, तर सेंद्रिय शेतीत 36 रुपये खरुज येतो, त्यामुळे पैशांची बचत आणि सेंद्रिय शेतीतील उत्पादित मालाला दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. रसायन मुक्त शेती या अभियानाची सुरुवात झाली असून यात अनेक खाजगी कंपन्या ही आता पुढे येत आहेत, यातून उत्पादित होणारा माल खरेदी केला जात असून त्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर होता चालली आहे.