ग्राहकांनो सावधान! मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देवगड हापूसच्या नावाखाली केरळ आंब्याची होतेय विक्री!
ग्राहकांनो सावधान! मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देवगड हापूसच्या नावाखाली केरळ आंब्याची होतेय विक्री!
ओरिजनल हापूस आंब्यांच्या पेट्यात केरळ आणि कर्नाटकी आंबे
मुंबई Apmc फळ मार्केटमधे १२ हजार हापूस पेट्या दाखल
नवी मुंबई: मुंबई apmc फळमार्केट्मधे कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक सुरु झाली आहे.. . त्याशिवाय केरळ व कर्नाटकातूनही आंबा यायला सुरवात झाली आहे .. पण जो हापूस म्हणून तुम्ही बाजारातून आंबा आणताय तो खरंच ओरिजनल हापूस आहे का? याची एकदा खात्री करा. कारण रत्नागिरी किंवा देवगड हापूसच्या नावाखाली तुमच्या माथी कर्नाटकचा आंबा मारला जात आहे. दामदुप्पट पैसे मोजून खरेदी केलेला हापूस ड्युप्लिकेट तर नाही ना? चला तर मग पाहूया पाहुयात यावरचा एक खास रिपोर्ट...
कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक करतात... कोकणचा हापूस आणि कर्नाटकी आंबा या दोघांच्या चवीत आणि सालीमध्ये फरक आहे... कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक करत आहेत.. . आंब्यांची अदलाबदल करून विक्री होत असून हंगामाच्या सुरवातीला असा प्रकार चित्र बाजार आवारात दिसून येत आहे .. कोकणातल्या हापूसचा भाव   4 ते 8 डझन पेटीला 2 हजार ते 6 हजार रुपयांना विकली जात आहे..   तर कर्नाटकच्या आंब्याचा भाव २०० ते ३०० रुपयेने विकला जात आहे... जो हापूस म्हणून तुम्ही बाजारातून जो आंबा आणताय तो खरंच ओरिजनल हापूस आहे का? याची एकदा खात्री करून घ्या.