सोने खरीददाराला लुटणारे जेरबंद; पनवेल गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी
नवी मुंबई, कळंबोली येथील मॅकडोनल्ड समोर पुणे- मुंबई मार्गावरील बस स्टॉपजवळ मागील महिन्यात अंबेजोगाई, बिड येथुन सोने खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकुन घातक शस्त्रासह त्याच्या जवळील १९ लाख रुपयांच्या लुटीचा प्रकार घडला होता. यावर अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांनी तासाभरात घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देवून उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी 'साक्षिदारांकडे सखोल चौकशी केली. तसेच याबाबत विशेष पथक नेमण्यात आले होते.
या पथकाने आरोपी अनिकेत जोमा म्हात्रे, वय २३ वर्षे, रा. ओवळेगाव, पो. पारगाव, ता. पनवेल जि. रायगड, कार्तिक सुशिल सिन्हा, वय- २४ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. कल्पनानगर, पाषाण लिंक रोड, बानेर पुणे, किरण विजय पवार, वय २१ वर्षे, धंदा- नोकरी, रा. घोटगाव, पो. कोयनावेळे, ता. पनवेल, जि. रायगड, भिमा रामराव पवार, वय- २१ वर्षे, धंदा- नोकरी, रा. घोटगाव, पो. कोयनावेळे, ता. पनवेल, जि. रायगड, मनोज गुरम्या राठोड, वय-२२ वर्षे, धंदा- मासेविक्री, रा.रु.नं. ५०४४, डॉ. बाबासाहेब आंबडेकर नगर, कफ परेड, कुलाबा, मुंबई तसेच लक्ष्मण सुभाष राठोड उर्फ लकी उर्फ वाघ्या वय-२१ वर्षे, रा. देविचापाडा, तळोजा एम. आय.डी.सी. तळोजा याना मोठया शिताफीने अटक केली. तसेच अटक आरोपींकडुन गुन्हा करतेवेळी वापरलेली ३ घातक शस्त्रे, फिर्यादी यांची रक्कम ठेवलेली बॅग, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने व लुटलेली संपुर्ण रक्कम अशी एकुण २२ लाख ५४ हजार एवढ्या रकमेची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
अंबेजोगाई बिड येथील सोन्याचे व्यापारी शुक्रवारी रात्री सोने खरेदी करण्यासाठी अंबेजोगाई येथुन खाजगी ट्रॅव्हल्स बस ने मुंबई येथे येत असत. प्रत्येक शनिवारी कळंबोली येथील मॅकडोनल्ड समोर सकाळी सातच्या सुमारास उतरुन अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याच्या परिचयाच्या व्यक्तिकडे फ्रेश होण्यासाठी जात असत, त्यांनतर ते सोने खरेदी करून पुन्हा संध्याकाळी खाजगी ट्रॅव्हल्स बस ने मुळगावी परत जात असे. हि माहीती अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याने त्याच्या इतर साथिदारांना देऊन दरोडा टाकुन लुटण्याचा कट रचला.
गुन्हे शाखा पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, सुदाम पाटील, पोलीस हवालदार प्रशांत काटकर, मधुकर गडगे, अनिल पाटील, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, ज्ञानेश्वर वाघ, सचिन पवार, जगदिश तांडेल, राजेश बैकर पोलीस नाईक इंद्रजित कानु, रुपेश पाटील, निलेश पाटील सचिन म्हात्रे, राहुल पवार, प्रफुल्ल मोरे, दिपक डोंगरे, नंदकुमार ढगे, अभिजित मे-या, पोलीस शिपाई संजय पाटील, प्रविण भोपी, विक्रांत माळी यांनी केली आहे.