अवकाळी पावसाचा फटका मुंबई Apmc भाजीपाला मार्केटवर नाही!
आवक वाढल्याने भाजीपाला दारातही वाढ
भाज्यांच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांना फायदा..!
नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे... त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे..मुंबई apmc भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली असून दरात सुद्धा वाढ झाली आहे .. भाज्यांच्या दरात वाढ होऊनही शेतकऱ्याला मातीमोल भावाने आपला शेतमाल व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे..भाज्यांच्या दरवाढीचा फायदा ना शेतकऱ्यांना आहे ना ग्राहकांना... मात्र मध्यस्ती असलेले व्यापारीच अधिकचा नफा कमावत आहेत. पिकवणाऱ्यापेक्षा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच अधिकचा फायदा होताना दिसून येत आहे.
मुंबई apmc भाजीपाला मार्केटमध्ये   एकूण ६५४ गाड्यांची आवक झाली आहे ..   घाऊक बाजारात   भाज्यांच्या दरात   कितीने वाढ झाली आहे जाणून घेऊया ..भाजीपाला मार्केटमध्ये आज मेथी १५ रूपये ,कांदापात   १५ ते २० , शेपू १५ रुपये , भोपळा २५ रुपये, शिमला ३५ ते ४० रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भाव ४० रुपये प्रतिकिलो, भेंडी ४६ रुपये दराने विक्री होत आहे.. आज गवार ७५ रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे, तर फरसबी ४० रुपये किलोच्या दरात दराने विक्री   होत आहे .. बाजारात   कोबीचा दर १० रुपये किलो आहे , फ्लॉवर १५ रुपये, टोमॅटो १५ रुपये, मिरची ४५ ते ५० रुपयाने विक्री होत आहे..