अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल
महाराष्ट्रात पुन्हा अलर्ट!   वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा
राज्यात पुन्हा गारपीटीची इशारा शेतकऱ्यांची धाकधूक वाढली
नवी मुंबई: मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात हरभरा, गहू, द्राक्ष, करडई, रब्बी ज्वारी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.फळबागांना गारपीटीचा तडाखा बसला आहे. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात वादळी पावसाने नुकसान केले आहे.
नागपूरसह विदर्भात १५ मार्च ते १८ मार्च या काळात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीटझाल्याने हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झालं आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.