सोयाबीन दरवाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल
सोयाबीन दरवाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल
सोयाबीन दर २०० ते ३०० रुपयांनी सुधारण्याची शक्यता
देशातील सोयाबीन उत्पादक   शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत सोयाबीन दरात प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी सुधारणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
यापुढील काळात हा कल कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.देशातील सोयाबीन प्रक्रिया आणि व्यापार क्षेत्रातील काही घटकांनी संगनमत करून खेळी केल्याचा हा परिणाम आहे. परंतु आता ही स्थिती बदलत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे चित्र निर्माण आहे. तसेच देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा साठा कमी होत चालला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती सोयाबीन दरवाढीला अनुकूल असूनही दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कृत्रिमरीत्या भाव दाबून ठेवणे आता जास्त दिवस शक्य नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
ब्युरो रिपोर्ट apmc news