30 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला; कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर प्रचंड मतांनी विजयी
30 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर प्रचंड मतांनी विजयी
पुणे : तब्बल 30 वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे.