पंतप्रधान मोदींना पोस्टाद्वारे कांदे भेट म्हणून पाठवले, नगरमधील शेतकऱ्यांची गांधीगिरी
कांद्याचे भाव   घसरल्याने शेतकरी संकटात सापडलेला असल्याने ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, आंदोलन करत आहेत. सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे ही मागणी घेऊन अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टामार्फत कांदे भेट म्हणून पाठवले आहेत. गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी गांधीगिरी केली आहे. सोबतच जर शासनाला कांद्याला भाव देता येत नसेल ते शेतकऱ्यांना रोटाव्हेटर घेण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला एक रुपयापासून सहा रुपयांपर्यंत कांदा विकावा लागत आहे.