रशियाकडून कच्चा तेलाची रेकॉर्डब्रेक आयात! लवकरच इंधनाच्या किंमतीत कपात?
रशियाकडून कच्चा तेलाची रेकॉर्डब्रेक आयात! लवकरच इंधनाच्या किंमतीत कपात?
नई दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. पण मोदी सरकारच्या खेळीमुळे भारताचा मोठा फायदा झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) अनेक देशात कच्चा इंधनाने खेळ बिघडवला. या देशातील अर्थव्यवस्थेला कच्चा तेलाने उद्धवस्त केले. पण मोदी सरकारने अशावेळी रशियाकडून कच्चा तेलाची आयात वाढवली. रशियाचे क्रूड ऑईल (Russian Crude Oil) भारताला अत्यंत कमी किंमतीत मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्धापूर्वी 1 टक्क्यांपेक्षा कमी कच्चा इंधनाची आयात होत होती. आता भारत 28 टक्के कच्चे तेल रशियाकडून घेत आहे. जानेवारीत भारताने प्रत्येक दिवशी 1.27 दशलक्ष बॅरल तेलाची रशियाकडून आयात केली. गेल्यावर्षी याच महिन्यात भारताचा वाटा केवळ 0.2 टक्के इतका होता. रशिया स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई (Petrol-Diesel Price) येऊ शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 24 तासात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) पुन्हा वधारले. ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव आज 83.16 डॉलर प्रति बॅरल झाले. तर डब्ल्यटीआई ऑईलमध्ये 1.23 टक्क्यांची वाढ होऊन ते 76.32 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. भारत रशियासह इतर देशांकडून कच्चा तेलाची खरेदी करत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.