सर्वात मोठी बातमी ! अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित
शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांची आंदोलन मागे घेतल्याची घोषणा
राज्य सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य
अखेर शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित झालं आहे. शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांनी तशी घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत, असं गावित यांनी जाहीर केलं.
  गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित झालं आहे. शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत, असं जीवा पांडू गावित यांनी स्पष्ट केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगतानाच गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले.
शेतकरी नेते, माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी सांगितले आहे कि काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निवेदन आम्हाला दिले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलकांना विश्वासात घेतलं. त्यानुसार आता आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांनी सांगितलं