सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! डाळींच्या दरात वाढ
डाळींच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांनाच फायदा..!
डाळींच्या किंमतीत 15   ते 20 रूपयांनी वाढ
नवी मुंबई: सामान्य जनता अगोदरच महागाईने त्रस्त आहे. त्यात पुन्हा तूर आणि उडीद डाळीच्या दरात वाढ झाली आहे.
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये डाळींच्या किंमतीत 15   ते 20   रूपयांनी वाढ झाली असून तूर आणि उडीद डाळींसह इतर डाळींच्या दरातही तफावत झाल्याचे दिसून येत आहे 
उडीद, मूग आणि तूर डाळींच्या दरबाबत चिंता व्यक्त केली जातेय. काही व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये परदेशातून येणाऱ्या मालाची मोठ्या प्रमाणात   साठवणूक करून ठेवली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकारने डाळींच्या दरवाढीवर नियंत्रण आणले नाही तर दर २०० रुपयांवर पोहचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे ..   आता उडीद, मूग यांची आवक वाढल्याने डाळींचे दर देखील वाढल्याचे दिसून येत आहेत.महिन्याभरात डाळींच्या किमतीत २० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात डाळींच्या दरात २० रुपयांची वाढ होऊन १५० रुपये किलो पर्यंत मजल मारली आहे .. ठोक बाजारपेठेमध्ये डाळीचे दर आधी ९० होते मात्र आता १२० रुपये किलो असे झाले आहेत. मागील आठवड्यात डाळींचे दर काय होते व आता दर कितीने वाढले आहे जाणून घेऊयात  
डाळीचे आठवडा पुर्वी         आताची भाव 
तूरडाळ 90 ते 98           115 ते 120
मूगडाळ 90 ते 95           100ते 105
चनाडाळ 50 ते 56           62 ते 65  
उडीदडाळ 90 ते 92         100 ते 105  
मसूरडाळ 78 ते 80         70 ते 72
डाळींच्या दरवाढीचा फायदा ना शेतकऱ्यांना आहे ना ग्राहकांना. मध्यस्ती असलेले व्यापारीच अधिकचा नफा कमावत आहेत.शिवाय आवक घटल्यामुळेही सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.