होळी सणालाही महागाईचा रंग
- सर्व प्रकारच्या रंगाच्या दरात सुमारे दहा टक्के वाढ
- मुंबई APMC   बाजारपेठात पिचकाऱ्यांसह विविध रंग उपलब्ध
- चीनला मागे टाकून देशी वस्तूंनी मारले मैदान
- बालसेनेसाठी मासे, बंदुका यासारख्या पिचकाऱ्या चर्चेत
नवी मुंबई : मुंबई APMCच्या   बाजारपेठत होळी रंगपंचमीची धूम पहावयास मिळत आहे. यावर्षी देखील बाजारपेठेला महागाईची झळ बसली असून रंगांसह रंग पंचमीला लागणाऱ्या पिचकाऱ्या तसेच इतर साहित्य काही प्रमाणात महाग झाल्याचे दिसून येत आहे.कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे सर्व प्रकारच्या रंगाच्या दरात सुमारे दहा ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. APMC परिसरात   विविध प्रकारचे विविध आकाराच्या, रंगाच्या पिचकाच्या दाखल झाल्या नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण आहेत. पिचकारी खरेदीसाठी बच्चेकंपनी गर्दी करत आहे.   रंगानी आणि पिचकाऱ्यांनी मुंबई APMC च्या   परिसरातील बाजारपेठ फुलल्या   आहेत.   विविध डिझाइनच्या व अनेक प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत .. १० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत पिचकाऱ्यांची क्रेझ आहे.   पिचकाऱ्या   खरेदीसाठी ग्राहकांची व लहानग्यांची झुंबड उडाली आहे.   मुंबई apmc मार्केट मध्ये   पिचकाऱ्या, रंग, मुखवटे, फुगे असा भरपूर माल दुकानातून उपलब्ध आहे. यंदा गुलाल उडविण्यासाठी सुद्धा खास पिचकाऱ्या आल्या आहेत. बाजारात वॉटर टँक, एअर प्रेशर, पाईप पिचकाऱ्या फार्मात आहेत तर बालसेनेसाठी मासे, बंदुका, बाहुल्या, पॉवर रेंजर,   यासारख्या पिचकाऱ्या चर्चेत आहेत..