सोयाबीन दरात पुन्हा वाढ; तर शेतकऱ्यांना ७० रुपये दराची अपेक्षा
गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. आठ दिवसांपूर्वीच सोयाबीनच्या दरात तब्बल ६०० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतरही सोयाबीनचे दर हे सावरले होते. दर कमी-अधिक झाला असला तरी शेतरकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई केली नाही. मध्यंतरी ६ हजार ८०० रुपये दर असतानाही जेवढी आवक होती. तेवढीच आवक सोयाबीनला ६ हजार ४०० दर असतनाही आहे. सध्या सोयाबीनचे दर काहीही असले तरी वाढीव दराची शेतकऱ्यांची प्रतिक्षा कायम आहे. ७ हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला तरच विक्री करणार असल्याची भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर तुरीची आवक सुरु होताच दर कमी होतील म्हणून हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी वाढत आहे.
यंदा सोयाबीनचा हंगाम लांबत आहे. दरवर्षी दिवाळी नंतर आवक वाढते आणि डिसेंबर अखेरपर्यंत आवक स्थिर राहून सोयाबीनचा हंगाम संपुष्टात येत असतो. यंदा मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा साठवणूकीवरच अधिक भर दिला. सध्या दर कमी-अधिक होत असले तरी साठवणूक याच भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. सध्याचा दर हा समाधानकारक असला तरी अनेकांना ७ हजारापेक्षा अधिकची अपेक्षा आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवासाला ५० ते ६० हजार पोत्यांची आवक असते त्या बाजारसमितीमध्ये 10 हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवकच झालेली नाही.
खरीप हंगामातील अंतिम पिक म्हणून ओळखले जाणारी तुरही आता बाजारात दाखल होईल. पावसामुळे तुरीची कापणी रखडलेली आहे. मात्र, यंदा तेलबिया आणि कापसाच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे या पिकांची हमीभावानेच खरेदी व्हावी असे काही नव्हते पण आता कडधान्यही बाजारात दाखल होणार आहे. यामध्ये तूर, हरभरा या पिकांचा समावेश राहणार आहे. यापूर्वीच सरकारने मोठ्या प्रमाणात तूर आणि हरभऱ्याची आयात केली असल्याने दर कमीचा राहणार आहेत. त्यामुळे हंगाम सुरु होण्यापूर्वीच हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे. तुरीचा आवक सुरु होताच पुन्हा दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल तूर- ६००१ रुपये क्विंटल, पांढरी तूर ६०५० रुपये क्विंटल, पिंकू तूर ५६७५ रुपये क्विंटल, जानकी चना ४९०० रुपये क्विंटल, विजय चणा ४९००, चना मिल ४८५०, सोयाबीन ६८००, चमकी मूग ७३५०, मिल मूग ६४५० तर उडीदाचा दर ७२००, पांढरी तूर ६०५० एवढा आहे.