मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये विजेचा धक्का बसून वाहतूकदार जखमी; अभियंता विभागाविरोधात व्यापारी आक्रमक
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये मोठी दुर्घटना घडली असून विजेचा धक्का लागून  एक व्यक्ती जखमी झाली आहे. धान्य मार्केटमधील एल पाकळीच्या मागे शौचालय  आहे.  तर येथील    विद्युत सबस्टेशन फार दयनीय अवस्थेत आहे. या शौचालयाचा वापर करण्यासाठी निरज नामक वाहतूकदार सकाळी 10.30 वाजता जात होता. यावेळी हि घटना घडली जखमीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या ठिकाणी 2 वर्षांपासून उघडी वायर आहे, सुमारे 8 ते 10 वेळा एपीएमसीचे अभियंता विभाग पाहण्यासाठी गेले आहेत. आज नीरज वाचला आहे, मात्र मार्केटमध्ये विखुरलेल्या तुटलेल्या वायरमुळे आणखी गंभीर दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे ते सबस्टेशन लवकर दुरुस्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
शिवाय सुमारे 50 पत्रव्यवहार करूनही एपीएमसी प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचे ग्रोमचे सचिव भीमजी भानुशाली सांगतात, आम्ही एपीएमसीला वर्षभरात 15 ते 20 कोटींचा सेस देतो, प्रशासनाने मार्केटचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही काय मरायचे? असा सवाल करत त्वरीत व्यावसायिकांच्या बाजूने प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे असे ते म्हणाले.