शेतकरी सहवेदनेसाठी १३ ते १९ मार्चदरम्यान निर्धार पदयात्रा, शेतकऱ्यांसह किसानपुत्र होणार सहभागी
शेतकरी सहवेदनेसाठी १३   ते १९   मार्चदरम्यान निर्धार पदयात्रा, शेतकऱ्यांसह किसानपुत्र होणार सहभागी
येत्या १३   ते १९ मार्चला जळगाव   जिल्ह्यातील किनगाव ते धुळे अशी शेतकरी सहवेदनेसाठी निर्धार पदयात्रा निघणार आहे. हे अंतर ११० किलोमीटरचे आहे. या यात्रेत शेतकऱ्यांसह किसानपुत्र आंदोलनातील कार्यकर्ते पूर्णवेळ सहभागी होणार आहेत. डॉ राजीव बसर्गेकर (नवी मुंबई) हे यात्रेचे मुख्य संयोजक आहेत. तर सुभाष कच्छवे (परभणी) हे त्यांना सहकार्य करणार आहेत.
कसा असेल पदयात्रेचा कार्यक्रम
पदयात्रा १३ तारखेला सकाळी नऊ वाजता कडू आप्पा यांना श्रद्धांजलीची सभा घेऊन प्रारंभ होईल. धानोरा करीत अडावदला मुक्काम करेल. १४   मार्चला बारडी वरुन चोपड्याला जाईल. १५   मार्चला निमगव्हाण करुन पाटोदा येथे रात्रीचा मुक्काम करेल. १६ मार्चला गडखांबमार्गे अंमळनेरला पोहोचेल.१७ मार्चला दुपारी जानवे करुन रात्री नवलनगर येथे मुक्काम करेल. १८   मार्चला वणी बु. करीत फागणे येथे मुक्काम करेल. शेवटचा टप्पा १९ मार्चला फागणे ते धुळे असा राहणार आहे. धुळ्यात या यात्रेचा समारोप होईल.पदयात्रेत सभा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिक शेतकरी, नागरिक आणि किसानपुत्रांनी व्यवस्था केली आहे.