सोयाबीन, हरभऱ्यासह कांद्याची आवक वाढली
सोयाबीन, हरभऱ्यासह कांद्याची आवक वाढली
हरभऱ्याची आवक गेल्या आठवड्यापासून वाढत आहे. ती पुढे काही आठवडे वाढत राहणार आहे. हरभऱ्या पाठोपाठ कांद्याची आवकसुद्धा आता वाढू लागली आहे. या महिन्यात मूग, मका, हळद व टोमॅटो यांची आवक उतरती होत असून सोयाबीनची आवकसुद्धा कमी होत आहे.   पण गेल्या दोन सप्ताहात ती, किमतीही कमी होत असल्याने,कापूस व तूर यांची आवक वाढत आहे.या महिन्यात कापूस, मका, हळद, हरभरा, सोयाबीन व कांदा यांच्या किमती कमी होत आहेत.रब्बीचा हंगाम अजून सुरु झाला नाही,त्यामुळे कांदा किंमतीतील घसरण चिंताजनक आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या किमती या सप्ताहात १.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,७०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. आवक गेल्या तीन आठवड्यांत वाढू लागली आहे.
मूग
मुगाच्या स्पॉट किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत गेल्या सप्ताहात रु. ८,१०० वर आली होती. या सप्ताहात ती १.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,००० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी होत आहे.
सोयाबीन
सोयाबीनच्या स्पॉट किमती जानेवारी महिन्यात कमी होत होत्या. या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत १.६ टक्क्यांनी घसरून रु. ५,५३० वर आली. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक कमी होती पण गेल्या दोन आठवड्यांत ती वाढली आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत या सप्ताहात ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ७,३४० वर आली आहे. तुरीची आवक वाढू लागली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.
कांदा
कांद्याची किंमत गेल्या सप्ताहात रु. ७५९ होती या सप्ताहात ती घसरून रु. ६४१ वर आली आहे. आवक वाढत आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत रु. ९६७ वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. १,००० वर आली आहे.आवक कमी होऊ लागली आहे.