आले दरात सुधारणा : उत्पादकांना दिलासा
आले दरात सुधारणा : उत्पादकांना दिलासा
प्रति गाडीस २० ते २२ हजाराचा दर
मुंबई apmc भाजीपाला मार्केटमध्ये मागील चार वर्षांत आले पिकाच्या दराने नीचांकी पातळी गाठली होती. यामुळे आले उत्पादक अडचणीत आले होते. याचा परिणाम आले पिकांच्या क्षेत्रावर झाला आहे .आले पिकाच्या दरात सुधारणा होऊ लागली असून, प्रति गाडीस ५०० किलो २० ते २२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.   मागील पाच वर्षांपासून दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.  
एकूण क्षेत्राच्या २० टक्के अधिक क्षेत्रावरील आले पीक काढले. गेले आहे. दरातील घसरणीमुळे क्षेत्रातही मोठी घट झाल्याने एकूणच आले पिकाचे क्षेत्र कमी शिल्लक आहे. यामुळे पुढील काळात दर आणखी सुधारणा होण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
ब्युरो रिपोर्ट apmc news