राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! कोणत्या पिकांना किती दिवस धोका?
नाशिक: राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा राज्यातील कोकण आणि मुंबई भाग वगळून इतर ठिकाणी अतिवृष्टी ते गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोरील अवकाळी पावसाच संकट आणि गारपिटीचा संकट अजूनही टळलेलं नाहीये. गेल्या आठवड्यात नाशिकसह आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता काही ठिकाणी गारपीटही झाली होती. त्यामुळे कांदा, द्राक्ष, केळी, हरभरा आणि गहू यांसह नगदी पीके आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही ठिकाणी गारपीट झाल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
राज्यात गेल्या आठवड्यातही अवकाळी पाऊस आला होता. त्यामध्ये आठ जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यामध्ये चिंतेची बाब म्हणजे काही ठिकाणी गारपीठ झाली होती. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात दर कोसळले आहे.
यामध्ये गव्हाची स्थितीही चिंताजनक असून कांद्यावर करपा रोग येण्याची शक्यता आहे. असे असतांना शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकट निर्माण झाले आहे. उद्यापासूनचे पुढील तीन दिवस 13 जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.