दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती
दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती
- टेंभू योजनेचे पाणी आल्याने शेतीसाठी फायदा झाला आहे.
- घाटमाथ्यावरील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची शेती केली आहे.
सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात टेंभू योजनेतून कृष्णेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे जीवनच बदलून गेले आहे. योजनेच्या पाण्यामुळे आधी कुसळ सुद्धा उगवत नसलेल्या जमिनीत आता उसाच्या शेतीसह नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागले आहेत. यातच आता सांगलीतील घाटमाथ्यावर स्ट्राबेरीची शेती फुललेली आहे. 4 महिन्यात सरासरी 14 टन उत्पादन मिळाले आहे . दीड किलोला सरासरी 400 रुपये दर मिळाला असून   याचा चांगला फायदा झाल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे ..   दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खानापुरात सारख्या पाण्याची कमतरता असलेल्या भागात स्ट्रॉबेरी पिकवल्याने सर्व स्तरांवर शेतकऱ्यांचे   कौतुक होत आहे. घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांनी   या भागात स्ट्राबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.