APMC Vegetable price :मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्याने भाव स्थिर
नमस्कार शेतकरी मित्रांनो APMC न्यूज डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे.. आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई APMC भाजीपाला घाऊक बाजारपेठा मध्ये आज चे भाजीपाल्याचे भाव आणि भाज्यांची   आवक,   भाजीपाल्याला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर हा बाजार समित्यांमध्ये कशाप्रकारे होता याबद्दल सविस्तर माहिती.
* राज्यात अवकाळी पाऊसामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले .. आज मुंबई apmc भाजीपाला मार्केट मध्ये भाज्यांची आवक वाढल्यामुळे थोड्याफार प्रमाणात भाज्यांचे दर घटले आहेत *
राज्यात अवकाळी पाऊसामुळे भाज्यांचे भाव दणाणले आहेत.. मुंबई apmc भाजीपाला   घाऊक मार्केट मध्ये   आज ६५९ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ   जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये आज ६५९ गाड्याची आवक झाली असून   मेथी   १५ रूपये ,कांदापात १४ ,शेपू १४ रुपये , भोपळा १७ रुपये, शिमला ३० रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भाव ३० रुपये प्रतिकिलो, भेंडी ३०   ,गवार ६५   रुपये किलोच्या दरात   विक्री होत आहे .. बाजारात   कोबीचा दर ७ रुपये किलो आहे , फ्लॉवर ११   रुपये, टोमॅटो १६ रुपये, मिरची ३५ ते ४८ रुपयाने विक्री होत आहे..   , कोथिंबीर चा दरात वाढ होऊन १५ रुपये दराने विक्री होत आहे.   तोंडली ४५ रुपये ,कारली ३० रुपये   किलोने विक्री होत आहे
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये आजचे आवक आणि बाजार भाव
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,APMC न्यूज डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे.. आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई APMC घाऊक कांदा बटाटा मार्केटमध्ये आज चे कांदा बाजार भाव आणि सोबतच असलेली कांद्याची नेमकी आवक किती व कांद्याला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सविस्तर माहिती.
मुंबई apmc   कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १५८ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया   कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी १०९ गाड्या आल्या असून कांदा   १३ ते १४ रुपये दराने विक्री होत आहे ..   बटाट्याच्या प्रत्येकी ४२ गाड्या आल्या असून बटाटा ९ ते १०   रुपये किलोने विक्री होत आहे .. तसेच लसूण च्या ७ गाड्या आल्या असून लसूण ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे.