संत्र्याच्या ४४० झाडापैकी चारशे झाडांना भरघोस संत्रा; शेतकरी सुखावलाm
संत्र्याच्या ४४० झाडापैकी चारशे झाडांना भरघोस संत्रा शेतकरी सुखावला
वनोजा येथील अल्पभूधारक शेतकरी पुरुषोत्तम राऊत यांनी २ हजार एकर क्षेत्रावर संत्रा फळ बागेची लागवड केली आहे. दोन एकरात १९ लाखांचे उत्पन्न काढल्यामुळे शेतकरी संत्र्यांमुळे मालामाल झाला आहे.. या शेतकऱ्याने हा यशस्वी प्रयोग केल्याने वनोजा परिसराची आता ऑरेंज व्हिलेज म्हणून ओळख निर्माण होत आहे. पुरुषोत्तम राऊत हे या आधी ते आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तुर, हरबरा याचे पीक घेत होते. मात्र त्यांना पारंपारिक शेती करुन काहीच मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी संत्रा फळबाग लावण्याचे ठरवले. सात वर्षांपूर्वी आपल्या दोन एकर शेतात जंबेरी या जातीच्या ४५० संत्रा झाडाची   लागवड केली. पाण्याचे योग्य नियोजन करत संत्र्यांची बाग फुलवली. राऊत यांनी केलेल्या कष्टामुळे फळबागेला यावर्षी चांगला बहार धरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या शेतकऱ्याकडे धाव घेत यावर्षी ७०० रुपये कॅरेटप्रमाणे संत्र्याचा बगीच्या मागितला आहे. यामध्ये २८०० कॅरेट संत्रा निघेल असा अंदाज आहे.जवळपास १९ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकरी पुरुषोत्तम राऊत यांना आहे.. मागील तीन वर्षांमध्ये राऊत यांना ९० गुंठे जमिनीमध्ये ३५ लाख ७० हजार रुपयांचे भरघोस उत्पन्न या संत्रा या फळबागेपासून मिळाले आहे.