मुंबई APMC फळ मार्केटमध्ये रक्तदान शिबीर
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई ब्लड सेंटर याच्या संयुक्त विद्यमाने २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते ५ हे शिबीर पार पडणार आहे. शिवाय मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप देखील केले जाणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना टेम्पो संघटनेने केले आहे.
गाळा कर. एफ-४ समोरील शिवसेना टेम्पो संघटना कार्यालय येथे शिबीर भरवण्यात आले आहे. शिवसेना टेम्पो संघटना, राजे शिवाजी उत्सव मंडळ, भारतीय कामगार संघटना, माथाडी आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ व शिवसाहयता सामाजिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.