मुंबई APMC मार्केटमधील काही पतसंस्था केंद्र सरकारच्या रडारवर
केंद्र सरकारने नवीन सहकार खाते निर्माण करून देशातील सहकार क्षेत्रावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या नावाखाली गैरउद्योग करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. नुकताच केंद्र सरकारच्या सहकार खात्याने देशातील ९ राज्यातील एकूण ४४ बहुराज्यीय सहकारी पत संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबाबत तक्रारी आल्याने केंद्र सरकारची कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील सुद्धा ९ पतसंस्थेचा समावेश आहे. त्यामुळे पतसंस्था चालकांचे धाबे दणाणले असून अनेक फसवणूक झालेले लोक केंद्र सरकारकडे धाव घेणार असल्याचे समजते.
तर मुंबई APMC मार्केटमधील काही पतसंस्थांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सभासद केंद्र सरकारच्या सहकार खात्याला तक्रार देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा सभासद तक्रारी केंद्र सरकारकडे प्राप्त झाल्यास मार्केटमधील अनेक पतसंस्थांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई APMC मार्केटमधील काही पतसंस्था केंद्र सरकारच्या रडारवर असणार आहेत.