APMC मार्केटमध्ये व्यापारी व अडत्यातर्फे शेतमालाचे स्वतंत्र लिलाव केंद्र सुरु होणार मुंबई APMC होणार हद्दपार!
मुंबई APMC मसाला मार्केट संचालक यांची   डाळिंब व्यापारी असोसिएशन सोबत अभद्र युती!
मुंबई APMCच्या eNAM केंद्र कोमात ,व्यापारी आणि अडत्याचे लिलाव केंद्र जोमात!
शासनाचे   eNAM केंद्र असून स्वतंत्र लिलाव केंद्र का?
या लिलावात शेतकरी,ग्राहक आणि व्यपाऱ्याना होऊ शकते फसवणूक?
नवी मुंबई : मुंबई APMC   मसाला मार्केट मध्ये बेदाण्याचे लिलाव केंद्र ९ मार्च पासून सुरु होत आहे .. त्याचे उदघाटन माझी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे..   हा स्वतंत्र लिलाव केंद्र मुंबई APMC मसाला मार्केट्चे संचालक   व   डाळिंब आडते असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने संचालक यांच्या   गोदामात होणार आहे   .. सर्वात महत्वाची बाब अशी आहे कि या लिलावात बाजारसमितीचा यावर कुठलाही नियंत्रण राहणार नाही त्यामुळे वयापारी व अडत्या संस्थांतर्फे सुरु होणाऱ्या शेतमालाची स्वतंत्र लिलाव केंद्रात मुंबई APMC हद्दपार होणार आहे..शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामधील दलालाची मध्यस्थी संपवण्यासाठी केंद्रसरकार कडून eNAM   योजना लागू करण्यात आली होती त्यामध्ये मुंबई apmc प्रशासकीय   इमारतीमधील eNAM   केंद्र आणि कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळे चे उदघाटन २८ जुलै २०२० रोजी मोठ्या थाटात करण्यात आली होती .   त्यानंतर ते सुरु झाल्यापासून त्यामध्ये कोणतेही लिलाव झाले नाही आणि आता ते बंद आहे ... बाजारसमिती प्रशासन तर्फे बंद पडलेल्या   eNAM केंद्रामध्ये हा लिलाव सुरु करणे गरजेचे होते परंतु शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या बाजारसमितीमध्ये व्यापारी आणि अडत्या यांच्या संयुक्तपणे सुरु होणाऱ्या या लिलाव केंद्रात   शेतकरी आणि ग्राहकांना फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ..   हा लिलाव केंद्र खरंच शेतकऱ्यांच्या फायदासाठी ठरू शकतो का ? यामध्ये शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला भाव मिळणार का ? अशे विविध प्रश्न उपस्थित होत आहे .
जे केंद्र बाजार समितीने सुरु करायला पाहिजे होते ते व्यापारी आणि दलाल मिळून करत आहे, त्यामुळे   ह्या लिलाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांना किती फायदा मिळणार ते काही दिवसात कळणार आहे. गेल्या वर्षी बेदाण्याचे उत्पादन १ लाख ३५ हजार टन इतके झाले होते. मात्र यावर्षी ते २ लाख टनांच्या घरात जाण्याच शक्यता   आहे. मुंबई बाजारातून वार्षिक पाच हजार कोटींची उलाढाल वाढेल, असा विश्वास मसाला मार्केट संचालक विजय भुता यांनी व्यक्त केला आहे. मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये जवळपास   ३०० दुकाने आहेत. मात्र येथेच बेदाण्याचे लिलावकेंद्र सुरू झाल्यास आणखी १०० दुकाने वाढतील आणि बाजार समितीचा व्यापार वाढेल, मात्र यामध्ये शेतकरी ,बाजारसमिती आणि ग्राहकांना कित्ती फायदा होईल ते थोड्या दिवसात कळेल .  
मुंबई APMC मसाला मार्केटमधील E विंग मध्ये एका व्यपाऱ्याच्या गोदामात   बेदाण्याच्या व्यापारासाठी स्वतंत्र लिलाव केंद्र सुरू केले जात आहे. . विशेष म्हणजे, हा लिलाव शेतकऱ्यांना थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येणार आहे आणि आपल्या बेदाण्याला हवा तो दर मिळवता येणार आहे.अशे ड्रायफ्रूट्स असोसिएशन च्या वतीने सांगण्यात येत आहे.मात्र या यामध्ये बाजार समितीचा कुठला ही   नियंत्रण राहणार नाही . शेतकऱ्यांना बाजार समिती मध्ये सतत फसवणूक सुरूच आहे आणि या नव्याने सुरु करणाऱ्या लिलाव केंद्रामध्ये ही मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते असे बाजारघटक सांगत आहे . या   लिलावात जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर शेतकरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तक्रार करू शकतात..   यामध्ये संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रावधान आहे अशी प्रतिक्रिया मुंबई APMC चे उपसचिव प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.
असा होणार लिलाव
शेतकरी आपल्या बेदण्याचे नमुने येथे पाठवतील. ज्यांना शक्य असेल ते प्रत्यक्ष लिलावात सहभागी होतील. व्यापारी आपला दर सांगतील. शेतकरी आपल्या पसंतीच्या किमतीला संमती देतील. ज्या शेतकऱ्यांना या लिलावात सहभागी होता येणार नाही, त्यांच्यासाठी या लिलावाच्या थेट प्रक्षेपणाची सुविधा केली जाईल. जेणेकरून बेदाणा उत्पादक शेतकरी घरी बसून आपला व्यापार करू शकतील.