गव्हाच्या किंमती पुन्हा गगनाला भिडल्या!
गव्हाच्या किंमती पुन्हा गगनाला भिडल्या   !
गव्हाच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर,कारण तरी नकी काय?
यंदा गव्हाचे भाव सर्वसामान्यांना पुन्हा रडवणार आहेत. महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यात गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील गव्हाचे वाटप बंद केल्यापासून खुल्या बाजारात गव्हाची मागणी वाढली आहे. राजस्थानमध्ये गव्हाच्या किंमती २८०० रुपये प्रति क्विंटलवर आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आताच गव्हाची किंमत ३००० रुपये प्रति क्विंटल झाली आहे. गव्हाच्या किंमती ३३०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल होण्याची शक्यता आहे.१८ ते २२ रुपयादरम्यान असणारे दर गेल्या वर्षी ३३ रुपयांच्या पुढे गेले होते
किरकोळ बाजारात गव्हाच्या किंमती जवळपास ३१ रुपये प्रति किलो आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या किंमती १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. केंद्र सरकारने वेळीच किंमतीत हस्तक्षेप केला नाही तर चांगल्या दर्जाच्या गव्हासाठी नागरिकांना मोठी किंमती मोजावी लागण्याची शक्यता आहे.