BREAKING: सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगाव मध्ये सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. कोरोना काळात सोने चांगलेच वधारले होते. त्यामुळे सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरूच होती. गेल्या अनेक दिवसापासून स्थिर असलेल्या सोन्या-चांदीच्या भावामध्ये आता मात्र मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात तब्बल ९०० रुपयांची घसरण होवून ४८ हजार ३०० रुपये प्रति तोळा झाला आहे. तर चांदीच्या भावात २ हजार ते २ हजार २०० रुपये घसरण होवून चांदीचा भाव ६३ हजार ६०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याने ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे. महिन्याच्या सुरुवातील २४ कॅरेट सोन्याचे दर ४८ हजार ५६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चादीचे दर ६२ हजार ०३० रुपये असा होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात भावात सलग पडझड दिसून येत आहे. सोने दरात ९०० रुपयांची घसरण दिसून आली. तर दुसरीकडे चांदी देखील २२०० रुपयांनी तुटली. यापूर्वी १८ जानेवारी रोजी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९ हजार ०४० इतका होता. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३ हजार ३५० रुपये इतका आहे.