मुंबई APMC फळ मार्केटमध्ये पपनस (Grapefruit) फळाची दमदार एन्ट्री
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये पपनस (Grapefruit) फळाची दमदार एन्ट्री
- पपनस हे फळ थंडीच्या मोसमात बाजारात येतात.
- मुंबई apmc मार्केट मध्ये १ ते २ हजार बॉक्सची आवक.
- फळाच्या एका पेटीला ५०० - ७०० रुपये भाव.
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून इजिप्त मधून पपनस (grapefruit ,pomelo ) या   फळाची आवक सुरु झाली आहे. हे फळ थंडीच्या मोसमात येते. फळ मार्केट मध्ये काही मोजक्या व्यापाऱ्यांकडे या फळाची आवक येत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते. सध्या हे फळ इजिप्त मधून येत असून मुंबई एपीएमसी बाजारात साधारण 1 ते 2 हजार बॉक्सची आवक होत आहे. या फळाच्या एका बॉक्समध्ये अंदाजे ६४ नग असतात .. घाऊक बाजारात त्याच्या एका पेटीला दर्जानुसार ५०० - ७०० रुपये भाव मिळत आहे. या फळाची शेती प्रामुख्याने कोंकण भागात जास्त होत असून त्या विभागात पपनसाला 'चकुत्र' 'बंपर' आणि 'चकोत्रा' अशा स्थानिक नावानी ओळखले जाते. पपनस हे संत्रं, मोसंबी अशा सायट्रस वर्गातील फळ असून ते प्रामुख्याने आशियात आढळते . आपल्याला हे फळ चाखायचे असल्यास आपण देखील एपीएमसी मार्केटमध्ये खरेदी करु शकता.