गुढीपाडव्यानिमित्त मुंबई APMC फळ मार्केट्मधे हापूस आंबा खारिदी करतात तर हे बातमी तुमच्यासाठी
हापूस आंब्याला बाजारात जोरदार मागणी सुरु
आंब्याचा दर डझनाला एका हजारांहुन जास्त
पावसाचा फटका बसल्यामुळे हापूसचे दर चढेच राहतील
नवी मुंबई: यंदा गुढीपाडवा २२ मार्च २०२३ रोजी   बुधवारी साजरा होणार आहे. गुढीपाडव्यापासून अनेक कुटुंबीय आंबे खाण्यास सुरुवात करतात. यामुळे गुढी पाडव्याच्या निमित्ताने हापूस आंब्याला बाजारात जोरदार मागणी सुरु झाली आहे. 
मुंबई apmc फळमार्केट्मधे आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मार्केटमधे गर्दी झालेली दिसून येत आहे त्याचप्रमाणे फुलांच्या,सजावटीच्या खरेदीसाठी ग्राहक गर्दी करीत आहेत .. 
मुंबई apmc मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुढीपाडव्याचे निमित्त साधून आंब्याची चांगली आवक होत आहे. गुढीपाडव्यामुळे हापूस आंब्याचे दर वाढले आहेत. अवकाळाची कोकणातील आब्यांला फटका बसला आहे. त्याचाही परिणाम दरवाढीवर झाल्याचे दिसून येत आहे.   आंब्याचा दर डझनाला एका हजारांपेक्षा जास्त आहे. नुकताच झालेल्या अवकाळाची फटका कोकणातील आब्यांला बसला आहे. त्यामुळे दर अजून जास्त आहे. पुढील महिन्यात हापूस आंब्याचे दर कमी होतील, असे सांगितले जात आहे.
फळमार्केट्मधे हापूस अंबाच्या बरोवर कर्नाटक,केरळ आणि बदामी अंबाच्या आवक
गेल्या आठवडाभरात कोकण पट्ट्यात झालेल्या पावसामुळे मार्केट मधे हापूस आंब्याची आवक ३० टक्क्याने होत आहे . तसेच केरळ ,कर्नाटक आणि बदामी अंबाच्या आवक होत आहे..तुम्ही हापूस आंबा खारिदी करतात तर पुर्ण चौकशी करुन खारिदी करा नाही तर तुम्हाला हापूसच्या नवाखाली केरळ आणि कर्नाटक अंबा देण्यात येणार आहे . रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर फळांच्या आकारानुसार चार ते सहा डझन पेट्यांसाठी ठरवले जात आहेत.
गुढीपाडव्याचा   शुभमुहूर्त
हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक गुडी उभारण्याची परंपरा आहे. मराठी लोकं गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारून पूजा करतात.
हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याची तारीख, पूजा पद्धत, कथा आणि महत्त्व जाणून घेउया. यावर्षी २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी २१ मार्च २०२३ रोजी रात्री १०:५२ पासून सुरू होईल आणि २२ मार्च २०२३ रोजी रात्री ०८:२० वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार २२ मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. दुसरीकडे,२२ मार्च २०२३ रोजीसकाळी ६.२९ ते ७.३९ हा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे.