मुंबई APMC मार्केटमध्ये भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबीर संपन्न
मुंबई APMC मार्केटमध्ये भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबीर संपन्न
सध्या देशावर ओमीक्रॉनचे संकट घोंगावत आहे. तर तिसऱ्या लाटेची चाहूल लागली असतानाच पुन्हा राज्यासह देशाला रक्तचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद आणि सामाजिक जबाबदारी म्हणून मुंबई APMC मार्केटमध्ये रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन केले गेले. मुबई APMC मार्केट आणि MGM हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य शिबिर पार पडले. शिबिरात बाजार घटकां उदंड प्रतिसाद मिळाला. तर रक्तदात्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवसनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. नेत्र आणि दंत चिकित्सेसह रक्तदाब आणि मधुमेह आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला. या शिबिराचे उदघाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्त तुटवडा भासला होता. त्यावेळी बाजार समितीने नवी मुंबईत सर्वात मोठे रक्तदान शिबीर भरून काही प्रमाणात तो तुटवडा भरून काढला होता. तसेच आता देखील रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आजच्या कार्यक्रमातून जवळपास ५०० बाटल्यांचे संकलन करणारे असल्याचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. तर तपासणी दरम्यान एखाद्या गंभीर आजार आढळून आल्यास त्याचा मोफत इलाज MGM रुग्णालयात केला जाणार असल्याचे सभापती अशोक डक यांनी सांगितले.
या प्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, मार्केट संचालक अशोक वाळुंज, निलेश वीरा, विजय भुत्ता, संजय पानसरे, शंकर पिंगळे, प्रविण देशमुख, महादेव जाधव, हुकूमचंद आमधरे, बाळासाहेब सोळस्कर, सचिव संदीप देशमुख तसेच सर्व बाजार घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.