कवडीमोल दराने हरभऱ्यांची विक्री
-हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४४०० ते ४५०० रुपये दर
-प्रतिक्विंटलमागे सातशे ते हजार रुपयांचा शेतकऱ्यांना   फटका
-केंद्र हमीभाव योजना राबवून शेतकऱ्यांची फसवणूक
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी केंद्र हमीभाव योजना राबवण्यात आली होती मात्र हि योजना म्हणजे   शेतकऱ्यांना दाखवलेलं गाजर असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.   जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे होणारे   उत्पादन आणि शासनाकडून केली जाणारी हरभन्याची खरेदी याच्या तुलनेत दहा टक्केही हरभरा खरेदी केला जाऊ शकत नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना फसवी असल्याची भावना व्यक्त होत आहे. 
सध्या खुल्या बाजारामध्ये ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल असा हरभऱ्याला दर मिळत आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल सातशे ते हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. खुला बाजारातील कमी दरामुळे शेतकऱ्यांना अगदीच कमी किमतीमध्ये हरभरा व्यापान्यांच्या हवाली करावा लागत आहे. यंदा जिल्ह्यात दोन लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली होती. तर हेक्टरी साडेअकरा क्विंटल उतारा मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाच्या वर्षात हरभऱ्याचे दोन लाख ५१ हजार टन उत्पादन होणार आहे. दरम्यान गेल्या वर्षी उत्पादकता केवळ ९.५ प्रति हेक्टर होती. ४४ केंद्रामध्ये २५ टन खरेदी झाली होती. यंदा मात्र आत केवळ २२ खरेदी केंद्र सुरू झाले आहेत खरेदीला १५ मार्च उजाडला. तरीही केंद्रावर खरेदी अद्याप सुरू झालेली नाही.