राजकीय वरदहस्त असलेल्यांची कोटींमध्ये वीज थकबाकी, वाचा धक्कादायक आकडेवारी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे मोठा संघर्ष सुरु आहे. असे असताना आता अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मात्र अजूनही ही तोडणी सुरूच आहे. असे असताना आता या थकबाकीची आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही सुमारे 42 हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे.
यामध्ये बघितले तर अनेक अल्पभूधारक आणि गरीब शेतकरी यांनी वीजबिल नियमीत भरत आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे वीजबिल अनेक महिन्यांपासून भरलेल नाही. त्याचा आकडा ही डोळे फिरवणारा आहे. यामुळे याचा त्रास मात्र अनेक अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक आकडा असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली आहे. तसेच येथे ऊस पट्टा असल्याचे शेतकरी पैसे भरू शकत असताना देखील याच ठिकाणी मोठी थकबाकी असल्याचे समोर आले आहे. पन्नास टक्के सवलत दिल्यानंतर ही थकबाकीची ही डोळे फिरवणारी आकडेवारी आहे. यामुळे आता महावितरण काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिवेशनात मोठ्याप्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला. ऊर्जामंत्री यांना सभागृहात वीज कनेक्शन कट करणार नाही अशी घोषणा करावी लागली. असे असताना देखील अनेक ठिकाणी वीज कट केली जात आहे. यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाला आहे. काही सधन शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे वीजबिल थकवले आहे.
यात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी असल्याचे याची चर्चा सुरु आहे. आता महावितरण पुढे काय कारवाई करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. महावितरणने अनेक योजना राबवल्या असल्या तरी याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार? सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.