अंडी गेली तरी कुठे? महाराष्ट्रात अंड्याचा दुष्काळ, रोज 1 कोटी अंड्यांचा तुटवडा, राज्य सरकार करणार हा उपाय
अंडी गेली तरी कुठे? महाराष्ट्रात अंड्याचा दुष्काळ, रोज 1 कोटी अंड्यांचा तुटवडा, राज्य सरकार करणार हा उपाय.
मंडे सोडा, संडेलाही मिळेना अंडे! राज्यात रोज 1 कोटी अंड्यांचे शॉर्टेज, भावात वाढ.
नवी मुंबई : महाराष्ट्रात काही दिवसांपासून अंडयाचा दुष्काळ (Shortage Of Eggs) पडला आहे. कोंबड्यांवर कोणत्याही रोगाचे सावट नाही ना दुसरे मोठे कारण, पण राज्यात खवय्यांना अंडी कमी पडत आहेत. बरं हा तुटवडा थोडाथोडका नाही, तर राज्यात प्रतिदिन जवळपास 1 कोटी अंड्यांचे शॉर्टेज आले आहे. प्रत्येक दिवशी फार मोठ्या प्रमाणात अंड्यांचा तुटवडा भासत असल्याने राज्य सरकारच्या   पशुसंवर्धन   कंबर कसली आहे. तर तोपर्यंत ग्राहकांना (Consumer) अंड्यांचा पुरवठा करण्यासाठीही सरकारी पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहे.
अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने पाऊल टाकले आहे. अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विभागाने योजना तयार केली आहे. राज्यात सध्या प्रत्येक दिवशी एक कोटी अंड्यांची कमतरता भासत आहे. राज्यात प्रत्येक दिवशी 2.25 कोटींहून अधिक अंड्यांची विक्री करण्यात येते. पण सध्या उत्पादन घटले आहे.
पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय पारकळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, राज्यात अंड्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी, ग्राहकांना अंड्यांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. कर्नाटक, तेलंगाणा आणि तामिळनाडू राज्यातून मोठ्या प्रमाणात अंड्यांची खरेदी करण्यात येत आहे.
राज्य पशुसंवर्धन विभाग अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाय योजना करत आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कुकुटपालन उत्पादकांना 1,000 पिंजरे, 21,000 रुपयांच्या सवलतीच्या दरात 50 व्हाईट लेघॉर्न कोंबडी देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. विभागाने याविषयीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे.
राज्यात अंड्यांचा तुटवडा जाणवत असल्याने पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. पण अंड्यांचे उत्पादन घटल्याने अंड्यांच्या किंमती वाढल्या आहेत. ठोक व्यापाऱ्यांनी भाव वाढविल्याने किराणा दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांनी अंड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे.
नवी मुंबई   येथील अंड्याचे ठोक व्यापारी अब्दुल वाहिद   यांनी अंड्यांच्या वाढलेल्या किंमतींची माहिती दिली. त्यानुसार, औरंगाबादमध्ये 100 अंड्यांसाठी सध्या 575 रुपये मोजावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या किंमती सातत्याने 500 रुपयांपेक्षा अधिक आहेत.