एकनाथ शिंदे यांचा विधान परिषदेत ठाकरे गटाला झटका देण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची नेमकी रणनीती काय?
एकनाथ शिंदे यांचा विधान परिषदेत ठाकरे गटाला झटका देण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची नेमकी रणनीती काय?
शिंदेंना कोंडीत पकडण्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार
शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु
शिंदे यांनी विधान परिषदेत प्रतोद नेमण्यासाठी   नीलम गोऱ्हेंना दिले पत्र
विधानसभे पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र पाठवलं आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे पत्रात सूचित केले आहे. गट नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रतोद नेमण्यासाठी   नीलम गोऱ्हेंना पत्र दिले आहे.प्रतोद नेमल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उद्धव ठाकरे गटातील विधान परिषदेतील आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार, अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम असणार आहे. ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार करण्यात येताना दिसत आहेत.