खळबळजनक !! मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये ATM मशीन फोडले, ड्राइवर ,क्लिनर निघाले चोर
 
चोरट्याने खामगांव येथून डाळी घेऊन आले होते
मार्केटमध्ये   ATM मशीन ,मोबाईल आणि   पान   टपऱ्या   फोडल्या    
सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटन
ड्राइवर आणि क्लिनर यांचा डाव फसला.  
APMC पोलिसांनी चोरट्यांना घेतले ताब्यात
मार्केटमध्ये चोरीच्या प्रमाण वाढल्याने बाजार घटकांमध्ये भीतीचे वातावरण
धान्य मार्केटमध्ये   CCTV नाही ,संचालकांचे दुर्लक्ष
नवी मुंबई : मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास खळबळजनक घटना घडली आहे.   खामगाव येथून डाळीचा माल भरून ट्रक ड्राइवर आणि क्लिनर यांनी मुंबई APMC धान्य मार्केट मध्ये आणला होता. मार्केटमध्ये गाडी उभी करून या दोघांनी पहिला पान टपरी फोडली त्यानंतर एका गाडीतून दोन मोबाईल चोरले , त्यांनतर धान्य मार्केटमध्ये व्यापार भवन येथील ICICI बँकेचे ATM मशीन फोडण्याच्या प्रयत्न करत होते त्यावेळी सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले . सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला .सुरक्षा कर्मचाऱ्याने दोघांना Apmc पोलिसांना ताब्यात दिले असून ,APMC पोलीस अधिक तपास करीत आहे. धान्य मार्केट्मधे कशाप्रकारे हा सर्रास चोरीचा प्रकार घडला पाहणार आहोत ह्या व्हिडिओ मध्ये ..
मुंबई APMC धान्य   मार्केटमध्ये विविध राज्यातून आणि परदेशातून शेतमाल येत असतात.सध्या मार्केटमध्ये   कडधान्याची आवक वाढून   दरात पण वाढ झली आहे त्यामुळे बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी   पाहायला दिसत आहे . बाजार समिती प्रशासन आणि संचालक मार्केटच्या सोईसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे . बाजार आवारात महिन्याभरात ४ ते ५ चोऱ्या होत असून यामध्ये व्यापारी आणि ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे . बाजार घटकांना योग्य सुविधा व सुरक्षांचे नियोजन करणे गरजेचे आहे नाही तर अशाच चोरीच्या   आणि अपघाती घटना वारंवार घडल्या जातील ..
मार्केटमध्ये डाळीचा माल भरून आलेल्या ट्रक ड्राइवर आणि क्लिनर ने मोठे साहस करून एका दिवसात तीन चोऱ्या केल्या आणि ATM   मशीन फोडले . या चोरटयांनी दोन मोबाईल चोरले असून पानटपरीची सुद्धा लूटमार केली आहे.. मात्र येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या चोरांचा सुपडासाफ केला आहे .. रात्रंदिवस आपली कामगिरी बजावत येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फार मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे..मात्र आज जरी येथे दुर्घटना टळली असली तरी हा प्रकार पुन्हा घडणायची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे ,याचे मुख्य कारण म्हणजे मार्केटमध्ये CCTV नसल्याने चोरीच्या घटना वारंवार घडत आहे याकडे बाजार समिती प्रशासन आणि संचालक लक्ष देणे गरजेचे आहे. 
आजची स्थिती पाहता   मार्केटमध्ये कोट्यवधींची उलाढाल आहे मात्र सुरक्षेसाठी   नियोजन नसल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये सुरक्षेसाठी काहीच उपायोजना नसतील तर मार्केटची परिस्थिती प्रचंड बिकट होऊ शकते आणि नक्कीच येथे दुर्घटनांचा सर्रासपणे बाजार मांडला जाईल.. तर लवकरात लवकर   संबंधित घटनेकडे लक्ष देऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीत भर करून CCTVची सोय बाजार आवारात करण्यात यावी..   जेणेकरून अश्या दुर्घटनांना आळा बसेल अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिली आहे .
धान्य मार्केटमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून CCTV बसवण्यासाठी प्रस्ताव दिला होता मात्र काही व्यापाऱ्यांनी आम्हाला CCTV ची गरज नाही कम्युनिटी हॉल बनवून द्या अशी मागणी केली .. आता व्यापाऱ्यांनो तुम्ही सांगा कि मार्केटमध्ये चोरी ,अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे यामध्ये तुम्हांला CCTV ची गरज आहे की   कॉम्युनिटी हॉलची   ,हे तुम्ही ठरवा मात्र आपल्या सुरक्षासाठी CCTV असणे हे अत्यंत गरजेचे आहे यामुळे चोरी आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल ..