राज्यात ठिकठिकाणी अवकाळीचा फटका, वाचा कुठे काय परिणाम
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई मध्ये पहाटे हळूहळू पाऊस अनेक ठिकाणी सुरु होता. हवामान खात्याने मुंबई मध्ये यलो एलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे.
कोकणात अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका आंबा पिकला बसला असून आलेला मोहर गळून पडला आहे. परिणामी आंबा हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंब्याच्या झाडा वरती आलेले छोटी कैरी सुद्धा गळून गेल्याने आंबा उत्पादक देखील हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे मोहरावर तुडतुडे आणि बुरशीकहा रोगांचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाने ऊसतोड मजुरांचे पालांची दैना केली आहे. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे ऊस तोड मजूराना मुलाबाळांसह चिखलात राहावे लागत आहे. तर उर्वरित ऊस तोडी ही खोळंबल्या आहेत.
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरु आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उद्यापासून होणाऱ्या संमेलनावर देखील परिणार होणार आहे. पावसामुळे मुख्य मंडपात पाणी आणि चिखल साचल्याने आयोजक चिंतेत आहेत. उद्या सकाळी होणाऱ्या ग्रंथदिंडी कार्यक्रम नंतर संमेलनाला सुरुवात होणार आहे. पावसामुळे संमेलनात खुल्या जागी होणारे अनेक कार्यक्रम देखील अडचणीत आले आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला पावसाचा फटका बसला आहे. मोकळ्या जागेवर होणाऱ्या कार्यक्रमांच्या जागा बदलल्या तरी मुख्य कार्यक्रमस्थळी देखील पावसाचे पाणी साचले आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात उद्या पासून 3 दिवस साहित्य संमेलन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ढगाळ वातावरणामुळे कांद्याची प्रत घसरली तर दक्षिण भारतातील पावसाने बाजार घसरला आहे. बाजार समितीत विकल्या गेलेल्या कांद्याला सरासरी आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटल इतका चालू हंगामातील नीचांकी भाव मिळला. खरीप कांद्याचा झालेला प्रचंड उत्पादन खर्च व प्रतिकूल हवामानामुळे घसरलेली एकरी उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. नवीन कांद्याला ही सरासरी 2100 ते 2800 रुपये मिळत होता दर आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.