तुरीच्या घसरणीनंतर पुन्हा वाढ शेतकऱ्यांना दिलासा
तुरीच्या घसरणीनंतर पुन्हा वाढ शेतकऱ्यांना दिलासा
नवी मुंबई: मागील आठवड्यात साडेआठ हजाराचा टप्पा गाठलेल्या तुरीच्या दरात काल मोठी घसरण बघायला मिळाली होती. आज, मात्र तुरीने पुन्हा उचल घेतली असून २०० रुपयांची दरवाढ झाली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ तारखेला तुरीलe ८५००रुपये इतका या हंगामातील उच्चांकी दर मिळाला होता. मात्र, काल या दरात मोठी घसरण होऊन ७९०० रुपये दर मिळाला. दोन दिवसात तब्बल सहाशे रुपयाची घसरण झाल्यामुळे शेतकरी थोडे चिंतेत होते. मात्र, आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा तेजी बघायला मिळाली आहे. वाशिमच्या बाजारात आज तुरीला किमान ७४५० ते कमाल ८१०० रुपये दर मिळाला आहे. तर दोन हजार क्विंटलची आवक झाली आहे. दुसरीकडे सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत. शेतकरी सोयाबीनसाठी चांगल्या दराची वाट पाहत आहेत. कापसाचे दर देखील स्थिरावलेत तर हरभऱ्याची देखील हमीभावानं खरेदी व्हावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
तुरीचे वाढते दर बघून विक्रीची गरज नसलेले शेतकरी आणखी काही दिवस तूर साठवून ठेवण्याच्या विचारात आहेत. मात्र, बहुसंख्य शेतकरी सध्या मिळत असलेल्या दरावर समाधान मानत काढणीनंतर तुरीची लगेच विक्री करत आहेत.