उन्हाळ्यात या पदार्थांनी उद्भवणार नाही पोटाची समस्या!
उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपले शरीर मसालेदार आणि तळलेले पदार्थ नीट पचवू शकत नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ लागते. या कारणांमुळे लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात पोटदुखी, गॅस, ऍसिडिटी, लूज मोशन आणि उलट्या यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात काही खास पदार्थांचा समावेश करायला हवा.
उन्हाळ्यात ताक हे वरदानच आहे. त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. यामध्ये असलेले नैसर्गिक बॅक्टेरिया पोटात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होण्यास प्रतिबंध करतात. पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये ताकाचा समावेश करा.
नारळाच्या पाण्यात भरपूर पोषक असतात, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि थंडावा मिळतो. यात शरीराला डिटॉक्स करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे अॅसिडिटी दूर होते. तसेच फायबर भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते.
उन्हाळ्यात पिकलेल्या केळीचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरसारखे गुणधर्म आहेत. पोटॅशियममुळे ते अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवते. केळीमध्ये फायबरमध्ये भरपूर असल्याने ते पचनाशी संबंधित इतर समस्या दूर करते.
अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर अॅसिड रिफ्लक्सने समृद्ध असल्यामुळे खरबूज पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरातील अनेक आवश्यक घटकांचा पुरवठा होतो आणि पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात खरबूज आपल्या आहारात ठेवा.