लतादीदींनी घेतला अखेरचा श्वास; अखंड भारत शोकसागरात
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आता आमच्यात राहिल्या नाहीत. आज 92 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मागील महिन्याच्या 8 जानेवारीला त्या मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी त्या कोरोना आणि न्यूमोनियाग्रस्त होत्या. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाला होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली, मृत्यूबरोबर झुंद देत त्या अखेर आज शांत झाल्या. त्यांच्या निधनामुळे जगभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांनी 92 वर्षाचं आयुष्य लाभलं, एवढ्या काळात त्या कधीच आजाऱ्या पडल्या नाहीत. त्या महान गायिका असल्या तरी त्यांनी खूप साधं आयुष्य जगल्या आहेत. लतादीदींना मासे आणि चटपटीत असं खाण्याचा छंद होता, मात्र जसजस वय होत गेलं तसं त्यांनी आपल्या खाण्यावर काही बंधनं घालून घेतली.