मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजचे बाजारभाव
मुंबई APMC   भाजीपाला मार्केटमध्ये ६३९ गाड्यांची आवक
शिमला मिरचीचे भाव ५ ते ६ रुपयांनी कमी
मटार ५३ रुपये किलो दराने विक्री
गवार ८० रुपये किलोच्या दरात   विक्री होत आहे
नवी मुंबई: मुंबई apmc घाऊक भाजारत भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला   घाऊक मार्केट मध्ये   आज ६३९ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेले चढउतार   जाणून घेऊया ..भाजीपाला मार्केटमध्ये आज आवक कमी झाल्याने दारांत वाढ झालेली दिसून येत आहे ..   मेथी   १५ रूपये ,कांदापात १६ ,शेपू १५ रुपये , भोपळा २० रुपये, शिमला ३२ रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भाव ५३ रुपये प्रतिकिलो, भेंडी ४६ ,गवार ८० रुपये किलोच्या दरात   विक्री होत आहे .. बाजारात   कोबीचा दर १० रुपये किलो आहे , फ्लॉवर १३ रुपये, टोमॅटो १५ रुपये, मिरची ४२ रुपयाने विक्री होत आहे.. कोथिंबीर १५ रुपये प्रतिजुडी दराने विक्री होत आहे.