संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे हेच ते?, CCTV फुटेजवरून पोलिसांनी दोन चेहरे हेरले!
मुंबई: महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या घटनेनं शुक्रवारचा दिवस गाजला. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला नेमका कुणी केला आणि त्यामागील हेतू काय आहे, हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. पोलिसांनी या दिशेने वेगाने तपास सुरु केला आहे. नुकतीच मुंबई पोलिसांच्या वतीने संशयित आरोपींची दोन छायाचित्र सादर करण्यात आली आहे. काल दिवसभर दादर, शिवाजी पार्क परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी खंगाळून काढली. यापैकी दोन सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांनी जारी केले आहेत. तर दोन चेहरे या घटनेतील आरोपी असल्याचं सांगण्यात येतय.