Apmc News:दहावीच्या विद्यार्थिनींचा वर्गातच हार्ट अटॅकने मृत्यू,अभ्यासाचा अति ताण;परीक्षा केंद्रात दुर्घटना

3
0
Share:

-अभ्यासाचा अति ताण;परीक्षा केंद्रात दुर्घटना

-दहावीच्या विद्यार्थिनींचा वर्गातच हार्ट अटॅकने मृत्यू

नवी मुंबई: वाशीतील मॉडर्न शाळेत दहावीत शिकणाऱया एका विद्यार्थीनीचा शाळेतच  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सायली अभिमान जगताप असे या विद्यार्थीनीचे नाव असून सकाळी ती चाचणी परिक्षा देण्यासाठी शाळेत गेली असताना हा प्रकार घडला. सायलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अभ्यासाच्या तणावातून तीचा मृत्यू झाला की अन्य कारणास्तव तिचा मृत्यू झाला आहे याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेतील मृत सायली जगताप हि आरपीआय तुर्भे विभाग अध्यक्ष अभिमान जगताप यांची कन्या असून ती तुर्भे स्टोअर्स विभागात रहाण्यास होती. तसेच ती वाशीतील मॉडर्न शाळेत इयत्ता दहावीत शिकत होती. शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परिक्षा सुरु असल्याने सायली मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे परिक्षेसाठी शाळेत गेली होती. सायली आपल्यासोबत बॅग घेऊन परिक्षा हॉलमध्ये गेल्याने शिक्षकांनी तीला सोबत आणलेली बॅग वर्गाबाहेर ठेवण्यास सांगितले.  त्यामुळे सायली वर्गाबाहेर बॅग ठेवण्यासाठी गेली असता, त्याच ठिकाणी ती अचानक कोसळून खाली पडली. यावेळी सायलीला फिट आल्याचे समजून शाळेतील शिक्षकांनी तीला उचलून वर्गात नेले. त्यानंतर तीला व्होकार्ड हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषीत केले.  मृत्युनंतर तुर्भे स्टोअर्समध्ये शोककळा पसरली आहे.

Share: